‘लाभार्थी’ राजकारण आणि स्त्रीमुक्तीचा संकोच प्रा. सचिन गरुड १० ऑगस्ट २०२६

जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर शैक्षणिक क्षेत्रात स्त्रीवादी विचारांना काही प्रमाणात संधी मिळाली खरी, पण विद्यापीठांमधील स्त्री व लिंगभाव अभ्यास केंद्रे एकाकी 'बेटां'सारखीच राहिली. ही मांडणी शैक्षणिक चौकटीतच मर्यादित राहिल्याने तिचे रूपांतर एका व्यापक आणि संघटित सामाजिक चळवळीत होऊ शकले नाही.फुले-आंबेडकरी, डावी आणि समाजवादी चळवळ क्षीण होण्याचा हा काळ असल्याने स्त्रीमुक्तीची चळवळही ओसरत गेली. याच काळा…